Ad will apear here
Next
दाजीकाका गाडगीळ करंडकाची चौथी आवृत्ती जाहीर
सौरभ गाडगीळपुणे : पीएनजी ज्वेलर्सतर्फे दाजीकाका गाडगीळ करंडक या एकांकिका स्पर्धेची चौथी आवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. हा करंडक दर वर्षी स्वर्गीय दाजीकाका गाडगीळ यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येतो. दाजीकाका गाडगीळ यांनी नेहमीच कला व संस्कृतीला प्रोत्साहन दिले आहे. ही मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेतील राज्यस्तरीय स्पर्धा असून, महाराष्ट्र व देशभरातील वेगवेगळ्या भागातील स्पर्धक यामध्ये भाग घेऊ शकतात.

 या स्पर्धेत सहभागी होण्यासाठीच्या प्रवेशिका पीएनजी ज्वेलर्सच्या पुणे, मुंबई, अहमदनगर, औरंगाबाद, सोलापूर, इंदौर, पणजी-गोवा येथील सर्व दालनांमध्ये दहा सप्टेंबर २०१९ पर्यंत उपलब्ध असतील. या स्पर्धेच्या प्रवेशिका www.pngjewellers.com या संकेतस्थळावर उपलब्ध असतील.

स्पर्धेची प्राथमिक फेरी २० सप्टेंबर ते पाच ऑक्टोंबर २०१९ दरम्यान होणार आहे. स्पर्धेची अंतिम फेरी पुण्यात ११ व १२ ऑक्टोंबर या कालावधीत होणार आहे. या शहरातील सर्वोत्कृष्ट संघ परीक्षकांद्वारे निवडले जातील. पुरस्कारांमध्ये एक लेखक, एक दिग्दर्शक, एक कलाकार (महिला व पुरूष), एक निर्माता, एक कला दिग्दर्शक व एक प्रकाश संयोजक यांचा समावेश असेल. प्रत्येक श्रेणीत तीन विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत. विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार असून, यामध्ये प्रथम क्रमांकास एक लाख रूपये, द्वितीय क्रमांकास रूपये ७५ हजार आणि तृतीय क्रमांकास रूपये ५१ हजार व दोन उत्तेजनार्थ संघांना प्रत्येकी दहा हजार रूपये देण्यात येतील. अंतिम विजेत्याला दाजीकाका गाडगीळ करंडक प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पीएनजी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले, ‘यशस्वीपणे सुरू करण्यात आलेल्या दाजीकाका गाडगीळ करंडकची चौथी आवृत्ती सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. मागील वर्षी आम्हाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. आम्ही या स्पर्धेची परंपरा अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत. या स्पर्धेमागील मुख्य उद्देश वेगवेगळ्या राज्यांतील प्रतिभांना प्रोत्साहन देणे हा आहे. केवळ रसिकांचा प्रतिसादच याला यशस्वी करू शकतो आणि आम्हाला पुढे जाण्यास मदत करू शकतो.’

 अधिक माहितीसाठी :  www.pngadgil.com
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZYRCE
Similar Posts
दाजीकाका गाडगीळ करंडक एकांकिका स्पर्धेची दुसरी आवृत्ती जाहीर पुणे : ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे दाजीकाका गाडगीळ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची दुसरी आवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. यंदाच्या स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या ११ ते २१ सप्टेंबरदरम्यान विविध शहरांत होणार असून, अंतिम फेरी २५, २६ सप्टेंबरला पुण्यात होणार आहे. पुण्यात तीन ऑगस्टला झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली
दाजीकाका गाडगीळ करंडक ‘रंगपंढरी’च्या ‘निरूपण’ एकांकिकेला पुणे : पीएनजी ज्वेलर्सतर्फे आयोजित दाजीकाका गाडगीळ करंडक या एकांकिका स्पर्धेत पुण्यातील रंगपंढरी संस्थेच्या ‘निरूपण’ या एकांकिकेने प्रथम क्रमाकांचे पारितोषिक पटकावले. अहमदनगरच्या नाट्यमल्हार प्रतिष्ठान ‘रंगबावरी’ या एकांकिकेला दुसरे आणि मुंबईच्या रूबरू प्रॉडक्शनच्या ‘घरवाले दुल्हनिया दे जायेंगे’ या एकांकिकेला तिसरे बक्षीस मिळाले
पीएनजी ज्वेलर्सतर्फे प्युअर हॅपिनेस ऑफर पुणे : सणासुदीच्या काळात ग्राहकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पीएनजी ज्वेलर्सतर्फे प्युअर हॅपिनेस ऑफर सादर करण्यात आली आहे. याअंतर्गत ग्राहकांना हिऱ्यांचे दागिने एक लाख १९ हजार रुपयांपासून उपलब्ध करण्यात आले आहेत. याशिवाय सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर २० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. ही ऑफर
पीएनजी ज्वेलर्सचे औंधमध्ये पहिले फ्रँचायजी स्टोअर पुणे : भारतातील सर्वांत विश्वसनीय ज्वेलरी ब्रँड असलेल्या पीएनजी ज्वेलर्सने फ्रँचायजी क्षेत्रामध्ये प्रवेश केला असून, त्यांनी आपले पहिले फ्रँचायजी स्टोअर औंध येथे सुरू केले आहे. याचे उद्घाटन दसऱ्याच्या मुहूर्तावर अभिनेत्री रवीना टंडन हिच्या हस्ते करण्यात आले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language